मुखपृष्ठ :

मुखपृष्ठ :
एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर जन्म घेणार्‍या तान्ह्या मुला

डॉ.श्रीकृष्ण राऊत यांच्या मराठी कविता

डॉ.श्रीकृष्ण राऊत हे समकालीन मराठी कवितेतलं एक महत्त्वाचं हस्ताक्षर.प्रयोगशीलता हा त्यांचा प्रतिभाधर्म.आशयसूत्रे आणि आकृतिबंध अशा दोन्ही अंतर्बाह्य अंगांनी अभिनव होऊन प्रकटणारी त्यांची कविता बहुरूपिणी आहे.कधी ती गझलसारख्या शास्त्रधाटीत रमते,कधी अभंग-लोकगीतांच्या अनघड लयीत लकेरी घेत लोकधाटीत विहरते;तर कधी छंदमुक्त होऊन लीलया दीर्घ पल्ला गाठते.‘एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर जन्म घेणार्‍या तान्ह्या मुला’ हा त्यांचा गाजलेला कवितासंग्रह.

नवीन ब्लॉग : *शिक्षण महर्षी,कृषिरत्न डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख*

नवीन ब्लॉग : *शिक्षण महर्षी,कृषिरत्न डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख* *स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री,भारत कृषक समाज आणि श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावती या सारख्या ख्यातनाम संस्थाचे संस्थापक अध्यक्ष, शिक्षण महर्षी,कृषिरत्न डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख हे सर्व जगाला परिचित आहेत.‘बहुजन हिताय’हा त्यांच्या जीवन-कार्याचा मूलमंत्र होता.‘वेद वाङमयातील धर्माचा उगम आणि विकास’ ह्या ग्रंथातील भाऊसाहेबांचे संशोधन भारतीय दैवतशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत मूलगामी स्वरूपाचे आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मा.भाऊसाहेबांच्या चरणी ही नम्र आदरांजली*
|| येथे वाचा ||

गझल / कविता सादरीकरण :

Loading...

डिसेंबर ब्याण्णवचे मर्ढेकर

पायांखाली माती नाही,
अस्मानाशी तुटले नाते;
अधांतराची उलटी गंगा
पुन्हा एकदा गोते खाते.

देव्हार्‍यातिल वीज-निरांजन
अखंड तेवत ठेवी बंधू;
संगणकाच्या पडद्यामागे
मंत्रमुग्ध पण त्याचा मेंदू.

बुडास पक्क्या फुटे शेपटी,
सुपीक डोके उगवी शिंगे;
घराघरातिल जंगल लावी
धार नखांना,दातासंगे.

धर्म-राज हे सत्य सांगती:
मादी म्हणजे केवळ मादी;

नंग्या तलवारींनी केली
भरबाजारी नग्न द्रौपदी.

3 टिप्पणी(ण्या):

HAREKRISHNAJI म्हणाले...

सुरेख

आशा जोगळेकर म्हणाले...

कठोर पण सत्य. सुंदर कविता.

डॉ.श्रीकृष्ण राऊत, म्हणाले...

मा.हरेकृष्णजी / आशा जोगळेकर ,
मन:पूर्वक आभार.

शीर्षकानुसार कवितांचा शोध :

शीर्षकानुसार गझलांचा शोध :

शीर्षकानुसार लेखांचा शोध :

`नाथ हा झाला संत महान' हे माझे गीत सुरेश वाडकर / उत्तरा केळकर यांच्या स्वरात ऐकण्यासाठी > क्लिक करा.

‘अनाथांचा नाथ नाथ महादेव’ हा माझा अभंग सुरेश वाडकर यांच्या स्वरात ऐकण्यासाठी > क्लिक करा.