सुचले तर सांगा
एखादे आधुनिक नाव
ह्या घरासाठी.
ज्याच्या समोर आहे
हिरव्या पाण्याचा स्विमिंग पूल
काळ्या म्हशींसाठी.
ताट्यांच्या कुंपणावर चढून
बकर्या खातात
अंगणातली फुलझाडं.
तोंडाला अजून शक्य झाला नाही
प्लॅस्टरचा मेकप.
दर्शनी भिंतीवर दिसतातना
वाळून काळपट झालेले
शेणाचे मुठीएवढे गोळे;
तो आहे कुठल्याशा रोगाचा उतारा;
आजीने फेकून मारलेला.
देव्हारा आणि संडासामध्ये
सुखाने नांदते अडीच इंची पडदी.
वाहनांना वाटते भीती
पेट्रोलच्या चोरीची
रोज रात्री
आणि फाटकाच्या पाटीवर-
बी अवेअर ऑफ मॅन.
याची सदस्यता घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)






0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा