भूल

तीन दगडांची चूल,
काडी-कचरा इंधन;
नालीशेजारी वाहत्या
झाडाखाली रंधावन.


ताट उपडे होऊन
झालो म्हणे पोळपाट;
वर आडवा गिल्लास
हळुहळू पोळ्या लाटं.


थंड परिसरामधे
रडे आकांताने मूल;
आत मालकाला दिली
पाय तोडणारी भूल.


झाके बसल्या बसल्या
दोन्ही टोंगळ्यांनी छाती;
पाही झ्यांपर काढून
काय चावणारे पाठी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा