भली

तोच पुरातन खोडा,
तेच जुने डावपेच;
कळलाव्या दगडाची
तुझ्या पावलांना ठेच.

कर वाघिणीची छाती
आणि पोलादाची नखं;
तेव्हा येईल जगता
तुला मनाच्यासारखं.

वीज होऊन कोसळ,
तेव्हा म्हणेल मी भली;
मला नाही आवडत
शेणामेणाची बाहुली.

२ टिप्पण्या: