चौथा दिवस

ऊठ राजा,
आपला आपण ऊठ!
बासरी फुंकून फुंकून घसा
तुझा दुखत नाही कसा?

ते सोड
आंगखैचून डबडं बडवं;
दाणेभरल्या कणसांवरची
पाखरं उडव.

गुल्लेरसाठी खडे गोळा करताना
छानपैकी शीळ घाल़;
आवडत्या गाण्याची
गुणगुण चाल.

घे मजुरी
जा बाजारी;
हिरवी हिरवी ताजी ताजी
ने तिच्या आवडीची भाजी.

जुने कॅलेंडर चुलीत घाल;
जळो हप्ते, महिने, साल;
संभाला तू बोल नवस
आज आहे चौथा दिवस!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा