सोडतांना गाय-बैल
हात अखेर जोडू दे;
त्यांच्या डोळ्यातले थेंब
माझ्या डोळ्यात पडू दे.
दवडीत उरलेला
आहे जरी चतकोर;
तांब्याभर पाण्यासंगं
देऊ दोघेही ढेकर.
झाल्या कोरड्या विहिरी,
तळे आटले, आटू दे;
माझ्या उरातली ओल
मला सर्वांत वाटू दे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा