सवाष्ण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सवाष्ण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सवाष्ण

तलखी पिवळी झोंबत अंगा
काळवंडली कात सावळी;
अंकुरलेल्या चैतन्याने
तिच्यावरी ये झाक जांभळी.

मानेभवती पडल्या खाचा,
बाही उतरे खांद्याखाली;
लेकुरवाळ्या स्पर्शसुखाने
ताठर चोळी थैली झाली.

राबराबत्या संसाराच्या
विरंगुळ्याला नसती खाडे
बिनाचिडीची रात आंधळी
समागमाला रुतती हाडे.

गालफडांनी बसून गावे
शृंगाराचे कडू गोडवे;
हातामध्ये ढिल्या बांगड्या
पायामधले ढिले जोडवे.