देवा बाप्पा नारायणा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
देवा बाप्पा नारायणा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

देवा बाप्पा नारायणा

देवा बाप्पा नारायणा
याहो मागच्या दाराने;
चिरेबंदी पुरोगामी
उडे लालची वार्‍याने.

येता काय रित्या हाती
आणा पणतीला फ्रॉक;
वीज चोरा उभ्या उभ्या
नका बसू देऊ शॉक.

पेल्यातल्या वादळात
बर्फ घालू काय थोडे;
साधण्याला पूजाअर्चा
चाटू काय सांगा जोडे.

नैवेद्याचा यक्ष प्रश्न
प्रभू सोडवा आमचा;
दुःख मोजण्यास द्याहो
एक चांदीचा चमचा!