एक काळाशार बोका लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
एक काळाशार बोका लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

एक काळाशार बोका

काळोखात विरघळलेला
एक काळाशार बोका
या इलाख्यात असल्याचं
ऐकिवात आहे.

अभयारण्यातल्या वाघासारखा
तो क्वचितच दिसतो म्हणतात.
कधीतरी 
तो येतो.
घरातल्यांची नजर चुकवून
सरळ सैपाकघरात घुसतो.

डोळे मिटून दूध पितो.
मिशांवर ताव मारत
निघून जातो.