एक काळाशार बोका

काळोखात विरघळलेला
एक काळाशार बोका
या इलाख्यात असल्याचं
ऐकिवात आहे.

अभयारण्यातल्या वाघासारखा
तो क्वचितच दिसतो म्हणतात.
कधीतरी 
तो येतो.
घरातल्यांची नजर चुकवून
सरळ सैपाकघरात घुसतो.

डोळे मिटून दूध पितो.
मिशांवर ताव मारत
निघून जातो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: