सुरुंग लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सुरुंग लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सुरुंग

त्यांच्या
पाळीव ज्योतिषांनी
मांडलेल्या कुंडलीत
नसतो ग्रह
इतिहासाची पुनरावृत्ती होण्याचा.

पण
गोदामात पडलेली
उंदरांची बिळेच
लावत असतात
सुरुंग
कुठल्याही सिंहासनाला.