सुरुंग

त्यांच्या
पाळीव ज्योतिषांनी
मांडलेल्या कुंडलीत
नसतो ग्रह
इतिहासाची पुनरावृत्ती होण्याचा.

पण
गोदामात पडलेली
उंदरांची बिळेच
लावत असतात
सुरुंग
कुठल्याही सिंहासनाला.