आधी

आधी
मला एक सांगा
तुमच्या हातांना
मनगटं आहेत की नाहीत?
म्हणजे काय आहे
की आजकाल
बिन मनगटांच्या संकरित बिजाची
पैदास खूप वाढली आहे.

मनगटं असल्यास
त्यात जोर आहे की नाही?
त्याचं असं आहे
की आलकडे अनेक हातांना
प्लॅस्टिकची कचकडी मनगटं आहेत
म्हणून विचारतो.

आणि हो,
नव्या लॉटमध्ये
काही तकलादू मनगटांवर
जन्मताच बांगड्याही आहेत म्हणे
तशा
तुमच्या मनगटांवर तर नाहीत ना?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: