देवा बाप्पा नारायणा

देवा बाप्पा नारायणा
याहो मागच्या दाराने;
चिरेबंदी पुरोगामी
उडे लालची वार्‍याने.

येता काय रित्या हाती
आणा पणतीला फ्रॉक;
वीज चोरा उभ्या उभ्या
नका बसू देऊ शॉक.

पेल्यातल्या वादळात
बर्फ घालू काय थोडे;
साधण्याला पूजाअर्चा
चाटू काय सांगा जोडे.

नैवेद्याचा यक्ष प्रश्न
प्रभू सोडवा आमचा;
दुःख मोजण्यास द्याहो
एक चांदीचा चमचा!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: