इडियट बॉक्स

१.
कमर्शियल ब्रेक-फास्टमध्ये
स्वीट डिश.
तिच्यात वाढलेला
आवाज आपोआप.

चावी भरलेल्या बाहुलीसारखं
एकदम चैतन्य संचारतं
फुलवाडीतल्या
फुलाच्या अंगात.

ते
नाचतं
आपल्याच तालात.
चावतं
कानानं चॉकलेटस्‌चं रूप.
पितं
डोळांनी सॉफ्टड्रिंक्सचे रंग.
जातं
ओढल्या संमोहित झाल्यागत
त्याच्याजवळ.
करतं
स्पर्श तर्जनीनं आइस्क्रीमला
अन्‌ लावतं
चव पाहण्यासाठी जिभेवर.
गिळतं
तोंडाला सुटलेलं पाणी
ओठांनी जाहिरात-गाणी
गुणगुणत.

२.
तिला राहवत नाही.
षहरातल्या फरसबंदीतही
कुठून तरी
ती पैदा करते शेण
नि रामपारी उठून
संधीवातावर मात करीत
पौषातल्या थंडीत
टाकते अंगणात सडा
रोज नव्या उत्साहानं;
साथीला
÷हरिमुखे म्हणा.÷

देवपुजेला बसावं तषी
आंघोळ करुन
मोठा भक्तिभावानं
बसते ती या चिकथ्यापुढे
रामायण सुरू झालं की.

सुरकुत्यांच्या जाळीदार
÷निढळावर कर ठेवून÷
सीतेची अग्निपरीक्षा पाहताना
ती हळहळते.
चष्मा काढते.
डोळे पुसते.

पुढे
क्लोजअपमध्ये
रामाच्या मुखवटाचे
दर्षन घेताना
जोडते दोन हस्तक
अन्‌ टेकवते त्यावर
आपले लीन मस्तक.

तिचा आत्मा दरवळतो
मनात पेटलेल्या उदबत्त्यांच्या
सुगंधानं.
आणि
तेवढापुरता
विसर पडतो तिला
दोन्ही डोळात पिकलेल्या
मोतीबिंदूंचा.

३.

ज्युडो.
कराटे.
फायटिंग.

ढिशॉंव. ढिशॉंव.
÷ये हाथ नही हथौडा है।÷
जो खिळवतो
रंगीत चौकोनात
हरिणीचे डोळे,
सशाचे कान.

बंद बाथरूम मधून येणारी
आईची हाक जाते विरून
वायावर
आणि
गॅसच्या शेगडीवर
उतू गेलेल्या दुधाचा
करपट वास
पसरतो हवेत
घरभर.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: