पंधरावी विद्या

कित्येक वर्षापासून
दरसाल पावसाळात
गळताहेत प्राथमिकची कौलारु छपरं
आणि
सुटी मिळाल्याच्या आनंदात
हुंदडतात भारताचे भावी आधारस्तंभ.
बारोमास निखळताहेत माध्यमिकच्या विटा
आणि
संस्थाप्रमुखांच्या नव्या बंगल्याचे एकेक वास्तू
साजरे होतात अषा वैभवात की
गरिबाची दहा-बारा लग्ने होतील त्यात सहज.

वहितीखाली असलेल्या
काळाभोर षेतजमिनीला
नॉन ऍग्रिकल्चर करवून
त्यातून उगवलेली महाविद्यालये
आभाळात कडाडणाया वीजरेषेसारखी
होताहेत क्रॅक
आणि
स्वतःचा तोल जात असलेल्या एका बेवडाने
दुसया बेवडाचा तोल सांभाळण्याचा प्रयत्न करावा
तसे उच्च शिक्षण सावरते आहे
मनुष्यबळविकास.

विचारवंत
सल्ला देत आहेत सरकारला :
नव्या शैक्षणिक धोरणात
यापेक्षा वेगळे खाजगीकरण
करण्याची आवश्यकता नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: