भरोत दिवस

शोभो 
मोरपीस खोवलेल्या
टोपाखाली
केसांचे सेटींग.

असो
एका कानात नागप्रतिमा;
तर दुसयात
अत्याधुनिक बाली.

खुलोत
पहाडी आवाजाच्या गळात
रंगीत मण्यांच्या माळांसोबत
सिनेसंगीताचे कचकडी हार.

येवो 
ढोल बडवणाया
हातांच्या बोटात
सिंथेसायझर
प्ले करण्याची किमया.

पडो 
एक पाय
घुंगराच्या तालावर
नि दुसरा
बॅंडच्या बोलावर.

लटको
उजव्या खांद्याला तीरकमठा
अन्‌
डाव्याला ए के फोर्टीसेव्हन.

दिसो 
एका डोळाला गोटुल
दुसयाला बी. एफ.

होवो
रानफुलावर
कॅक्टसचे कलम.

फुटो
नराच्या धडाला
सिंहाचे शीर
आणि
भरोत 
दिवस
हिरण्यकश्यपूचे
शिघ्रातिशिघ्र.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: