तुम्ही

तुम्ही
दिलीय मला
हसण्याची मुभा-
दोन इंच लांब
दोन इंच रुंद
आणि
माय मेली तर
रडण्याची सवलत-
पापण्या कोरड्या ठेऊन,
हुंदका न देता.

तुम्ही
बायकोशी भांडू देता मला
मूकचित्रपटाबरहुकूम
मित्रांवर करू देता प्रेम-
माणसी सहाशे ग्रॅम फक्त.

तुम्हीच
ठरवता माझी आवड-निवड;
निश्चित करता माझी श्रद्धास्थानं.

माझा पोषाख
माक्या व्यवसायाशी
होतो की नाही मॅच
याचे सर्टिफिकेट देता
तुम्ही मला
माझ्या
पगाराचा हिशेब
तुम्हालाच जास्ती ठाऊक
माक्यापेक्षाही
माझी भाषा
होऊ नये शिवराळ
तुमच्या दृष्टीने
म्हणून
तुमची सुसंस्कृत कैची
कापते माझी जीभ
वारंवार.

तुम्ही
सतत ओढता रेघ
माक्या पावलांसमोर
भाग पाडता मला
नमस्काराचा रतीब घालायला
आणि
नसलेले शेपूट हलवायला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: