शुभेच्छा व्यक्त केल्याने
शुभ झाले असते तर
कुत्रे कशाला फिरले असते भोंगळे
अन्
हराममौत मरणार्या
कुत्र्यासारखे हे आयुष्य
कोणत्याही वेळी
येऊ शकते भरधाव वाहनाखाली
कुठल्याही राजमार्गावऱ.
कावळ्याच्या शापाने
जशा मरत नसतात गाई
तितकीच असते
शुभेच्छाही वांझ़.
गूळ घालून
जहर देणार्या तर्हांच्या
फुटलेल्या पेवात
ज्या पापणीचा उपटावा केस
नेमके त्याच डोळ्याला येते पाणी;
दुसरा
असतो ठणठणीत कोरडा.
दोघात अंतर तरी किती?
नाकाचा मामुली आडोसा फक्त;
यावरून
येऊ शकते कल्पना
भिंतीपलिकडच्यांची,
मैलोगणती दूर असणार्यांची
अन्
आजकाल तर म्हणे
समोरासमोर
भेटणार्यांच्याही मधात असते
एक काचेची भिंत
ज्यातून
ऐकू येतात केवळ
भाषणे अन् टाळ्या;
दंगलीत मेलेल्या
मुलाच्या आईचा टाहो
वगळूऩ.
जेथे
शुभेच्छा कशाशी खातात
हेच नसते ठाऊक
तेथे
कवडीमोल असते पसायदान
अन्
कविता तर नसते त्यांच्या गावीही़.
शुभ झाले असते तर
कुत्रे कशाला फिरले असते भोंगळे
अन्
हराममौत मरणार्या
कुत्र्यासारखे हे आयुष्य
कोणत्याही वेळी
येऊ शकते भरधाव वाहनाखाली
कुठल्याही राजमार्गावऱ.
कावळ्याच्या शापाने
जशा मरत नसतात गाई
तितकीच असते
शुभेच्छाही वांझ़.
गूळ घालून
जहर देणार्या तर्हांच्या
फुटलेल्या पेवात
ज्या पापणीचा उपटावा केस
नेमके त्याच डोळ्याला येते पाणी;
दुसरा
असतो ठणठणीत कोरडा.
दोघात अंतर तरी किती?
नाकाचा मामुली आडोसा फक्त;
यावरून
येऊ शकते कल्पना
भिंतीपलिकडच्यांची,
मैलोगणती दूर असणार्यांची
अन्
आजकाल तर म्हणे
समोरासमोर
भेटणार्यांच्याही मधात असते
एक काचेची भिंत
ज्यातून
ऐकू येतात केवळ
भाषणे अन् टाळ्या;
दंगलीत मेलेल्या
मुलाच्या आईचा टाहो
वगळूऩ.
जेथे
शुभेच्छा कशाशी खातात
हेच नसते ठाऊक
तेथे
कवडीमोल असते पसायदान
अन्
कविता तर नसते त्यांच्या गावीही़.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा