डोक्यावर जुलमी आभाळ

डोक्यावर जुलमी आभाळ
अन्‌
पायाखाली सरकती वाळू
अशा
अधांतरी आयुष्याचा हात
हातात असताना
कसे पुढे रेटावे?

ह्या प्रदेशातला
वाराही मोठा शिरजोर
समोरून
सरळ छातीवर येऊन आदळतो

आपली दिशा कोणती?
हे स्वच्छ समजायच्या आतच
दाही दिशा काळोखाने जिंकलेल्या

मग
बकाल गावातल्या
निर्वासितासारखे
आपण
स्वतःच्याय श्वासांच्या आडोशाला
शांतपणे पहुडावे;
रक्तातले दिवे मालवूऩ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: