रिन्युअल

आपण
एकमेकांना अधूनमधून भेटण्याची
काही निमित्ते शोधून काढुया

तुम्ही तुमच्या मुलीच्या वाढदिवशी
मला फराळाला बोलवा
मी माक्याकडे तुम्हाला
सत्यनारायणाच्या तीर्थप्रसादाला
बोलवीऩ

उसन्या घेतलेल्या साखर-तेलाप्रमाणे
आपण
आपले देणे-घेणे त्वरित परत करूया़
तुमच्या
फ्रीजमधले आंब्याचा रस घातलेले
आईस्क्रिम खाताना
मी तारीफ करीन
तुमच्या मिसेसच्या सुगरणपणाची
आणि
माक्या घरच्या
स्वीट्सची टेस्ट सांगताना
तुम्ही कौतुक करा
माक्या बायकोच्या होमसायन्सचे

आपण
एकमेकांना
आपले घरभाडेही विचारूया
आणि मग
महागाई, राजकारण, भ्रष्टाचार
यावर चर्चा तर आलीच
एकमेकांचे
अथभिनंदन करण्याचा
तसेच सांत्वनही करण्याचा
तर आहेच आपला आलखित करार

आपण
आहोत एकमेकांचे काळजीवाहू सरकार
तेव्हा आपण एकमेकांना विचारूया,
कसं काय? काही नवल विशेष?''
आणि खोटं खोटं हसून उत्तरही देऊया,
एकदम मजेत! फिकर नॉट!''

हे सर्व करताना
एक अट मात्र कंपल्सरी :
आपण एकमेकांच्या मागे
जमतील तशा
थोड्याफार शिव्याही द्याव्या
एकमेकांना.

बरेच दिवस झालेत
आपण
सहकुटुंब एकमेकांकडे आलो-गेलो नाही
इतक्यातच
तुमच्या मुलाचा वाढदिवस होता ना?
नाहीतर पुढच्या वीकमध्ये आहेच
माझ्या वडिलांचे वर्षश्राद्ध.

आपण
थोडेसे परिचित वगैरे असल्याने
एकमेकांची ओळख विसरू नये
म्हणून निमित्ते शोधुन
रेशनकार्डसारखे रिन्युअल करूया
आपल्या ओळखीचे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: