*जन्म १ जुलै १९५५,
*एम.कॉम.,एम.ए.,एम.फिल.पीएच्.डी.(मराठी,वाणिज्य)
*सध्या अकोला येथे श्री शिवाजी महाविद्यालयात वाणिज्य विभागात सहयोगी प्राध्यापक
*१९७६पासून गझल, कविता लेखन.*१९८९ला ‘गुलाल’ गझल संग्रह प्रकाशित.*२००१ला ‘एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर जन्म घेणार्या तान्ह्या मुला’ कवितासंग्रह प्रकाशित.या संग्रहाला वि.सा.संघाचा शरच्चंद्र मुक्तिबोध स्मृति पुरस्कार, म.सा.प.चा कवी यशवंत पुरस्कार,पद्मश्री विखे पाटील विशेष साहित्य पुरस्कार,भि.ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार,संजीवनी खोजे स्मृति पुरस्कार,यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार,तुका म्हणे पुरस्कार.
* मौलिक मराठी गझल लेखनाकरिता बांधण जन प्रतिष्ठान,मुंबईचा
जीवन गौरव पुरस्कार.
*मराठी गझलमधील विशेष योगदानाबद्दल यू आर एल फौंडेशनचा गझल गौरव पुरस्कार.
*२००३ ला ‘गुलाल आणि इतर गझला’ गझलसंग्रह प्रकाशित.*२००३ला ‘चार ओळी तुझ्यासाठी’ हा मुक्तकांचा संग्रह प्रकाशित.*२००७ ला ‘चार ओळी तुझ्यासाठी’ ब्रेल लिपीत प्रकाशित.
*संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि इयत्ता अकरावीच्या अभ्यासक्रमात कवितांचा समावेश.
*साहित्य अकादमीची प्रवासवृत्ती प्राप्त.
*‘राघूमैना’ या मराठी चित्रपटासाठी गीतलेखन.*आशा भोसले, सुरेश वाडकर,उषा मंगेशकर, उत्तरा केळकर, सुधाकर कदम, भीमराव पांचाळे,दिनेश अर्जुना,मदन काजळे,रफिक शेख या नामवंत गायकांच्या स्वरात ध्वनीफिती,सीडीत अनेक गझल,कविता समाविष्ट.
*श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावती निर्मित,राजदत्त दिग्दर्शित डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या जीवन-कार्यावर आधारित 'ज्ञानगंगेचा भगीरथ' हया चित्रपटाकरिता पटकथा,संवाद,गीत लेखन.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा