डोक्यामधून काढून टाक
सिनेमातली सुहागरात;
अन् उजेड थोडा पडू दे
थेटरातल्या अंधारात.
संसाराला ठिगळं लावत
रोज डोळे फोडते माय;
सुईहूनही बारीक भोक
मोतीबिंदुला दिसते काय.
तुझ्या नव्या डोळ्यांनी
तिला दोरा ओवून दे;
सुईटोचली बोटे तिची
तू जरा चुंबून घे.
डोक्यावरती मुकुटावाणी
मिरव तिचे कष्टाळू हात;
पोलाद वाकविण्याची धमक
येईल तुझ्याही मनगटात. .
सिनेमातली सुहागरात;
अन् उजेड थोडा पडू दे
थेटरातल्या अंधारात.
संसाराला ठिगळं लावत
रोज डोळे फोडते माय;
सुईहूनही बारीक भोक
मोतीबिंदुला दिसते काय.
तुझ्या नव्या डोळ्यांनी
तिला दोरा ओवून दे;
सुईटोचली बोटे तिची
तू जरा चुंबून घे.
डोक्यावरती मुकुटावाणी
मिरव तिचे कष्टाळू हात;
पोलाद वाकविण्याची धमक
येईल तुझ्याही मनगटात. .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा