भूल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
भूल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

भूल

तीन दगडांची चूल,
काडी-कचरा इंधन;
नालीशेजारी वाहत्या
झाडाखाली रंधावन.


ताट उपडे होऊन
झालो म्हणे पोळपाट;
वर आडवा गिल्लास
हळुहळू पोळ्या लाटं.


थंड परिसरामधे
रडे आकांताने मूल;
आत मालकाला दिली
पाय तोडणारी भूल.


झाके बसल्या बसल्या
दोन्ही टोंगळ्यांनी छाती;
पाही झ्यांपर काढून
काय चावणारे पाठी.