चौथा दिवस लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
चौथा दिवस लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

चौथा दिवस

ऊठ राजा,
आपला आपण ऊठ!
बासरी फुंकून फुंकून घसा
तुझा दुखत नाही कसा?

ते सोड
आंगखैचून डबडं बडवं;
दाणेभरल्या कणसांवरची
पाखरं उडव.

गुल्लेरसाठी खडे गोळा करताना
छानपैकी शीळ घाल़;
आवडत्या गाण्याची
गुणगुण चाल.

घे मजुरी
जा बाजारी;
हिरवी हिरवी ताजी ताजी
ने तिच्या आवडीची भाजी.

जुने कॅलेंडर चुलीत घाल;
जळो हप्ते, महिने, साल;
संभाला तू बोल नवस
आज आहे चौथा दिवस!