ओल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
ओल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

ओल

सोडतांना गाय-बैल
हात अखेर जोडू दे;
त्यांच्या डोळ्यातले थेंब
 माझ्या डोळ्यात पडू दे.

दवडीत उरलेला
आहे जरी चतकोर;
तांब्याभर पाण्यासंगं
देऊ दोघेही ढेकर.

झाल्या कोरड्या विहिरी,
तळे आटले, आटू दे;
माझ्या उरातली ओल
मला सर्वांत वाटू दे.