दर्शन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
दर्शन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

दर्शन

थांब,
थांब,
या उच्चासनावरून
मला पाय खाली ठेवू दे
आणि
मगच माझे दर्शन घे.

राहोत
माझे पाय जमिनीवर सतत
आणि
तुझे झुकणे संपूर्ण
एवढंच
मला म्हणायचंआहे.