भूमिका

सकाळ चढत जाते
तशी कामं पळू लागतात
हातापुढे
नि पाय टाइल्सला लागतात
न लागता...

आवडी-निवडी,
शाळा-डबा,
हवे-नको
आणि चतकोरभर
उदरंभरणं...

एक हट्टी कण
अडून बसतो झडपेवर;
गटगट पाण्याला समजत नाही;
कणभर सरकत नाही;
ठसकतो-
सत्तरच्या वेगातल्या टाइपरायटरसारखा;
तडफडतो-
फुल्ल फॅनपुढच्या उघड्या फाइलीगत ...

काट्याच्या गळातून
ती कशीबशी सावरते.
आवरते.
दुसर्‍या भूमिकेसाठी
‘तयार’ होते.
पापा घेते.टाटा करते.
अन् रस्यावरच्या गर्दीत
सटकन् गायब होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: