चांगदेवा,
तुझं चांगभलं!
हे बाकी छान केलं :
भिंत चालवण्यापरीस
ती पाडणं केव्हाही चांगलं!
माणसासारख्या भिंतीही
लेऊन येत नाही अमरपट्टा.
डावीकडच्या शेजा-याचंच पहाना-
पावाचे चार-दोन साधे तुकडे
अन् व्होडक्याचे पाच-सात मामुली थेंब
यांनी पाडलंच की नाही भगदाड
पोलादी भिंतीला.
हां,आता
उजव्या अंगाच्या बिढाराचं प्रकरण
थोडं भक्कम आहे खरं;
पुरुषभर रुंदीची तटबंदी मैलोन् मैल
आणि तीही तगड्या चांदीची.
पण
नीट कानोसा घेतला तर
आतून ऐकू येतील तुला
पायात चिणलेल्या आत्म्यांच्या धडका
ज्या सारखी वाट बघताहेत
तुझ्या निमित्तमात्र
करंगळीची.
( 'कविता-रती' दिवाळी 2001)
तुझं चांगभलं!
हे बाकी छान केलं :
भिंत चालवण्यापरीस
ती पाडणं केव्हाही चांगलं!
माणसासारख्या भिंतीही
लेऊन येत नाही अमरपट्टा.
डावीकडच्या शेजा-याचंच पहाना-
पावाचे चार-दोन साधे तुकडे
अन् व्होडक्याचे पाच-सात मामुली थेंब
यांनी पाडलंच की नाही भगदाड
पोलादी भिंतीला.
हां,आता
उजव्या अंगाच्या बिढाराचं प्रकरण
थोडं भक्कम आहे खरं;
पुरुषभर रुंदीची तटबंदी मैलोन् मैल
आणि तीही तगड्या चांदीची.
पण
नीट कानोसा घेतला तर
आतून ऐकू येतील तुला
पायात चिणलेल्या आत्म्यांच्या धडका
ज्या सारखी वाट बघताहेत
तुझ्या निमित्तमात्र
करंगळीची.
( 'कविता-रती' दिवाळी 2001)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा