उमा
कां होत नाहीस
तू माझी माय
तू केलंस
माझं
दुखलं-खुपलं,
हागलं-मुतलं
होय-नोय.
मी चोखली तुझी स्तनं.
तू फिरवली बोटं माझ्या केसातून.
तू मला आईसारखी.
मी तुला मुलासारखा.
-पण सारखाच ना!
स्तनं होती कोरडी
आणि
केस राठ.
तुला माझ्या
मूलपणाचा बाट;
मला हिणावते
मांडीमधून
वासना ताठ.
संभोगाचा अर्थ
सम भोग
नाही केला
म्हणून का ही शिक्षा-
होत नाहीस तू माझी माय?
पोट
अन्
ओटी पोट
भरल्यावर
कां होत जातो
दुय्यम-
पुरुषोत्तम!
तुझी योनी,
तुझे स्तनः
अख्खे तुझे
आईपण.
माझ्या जननीचा
पाडलास विसर मला;
पण झाली नाहीस
माझी माय.
उमा,
पारू,
गौरी,
तुला म्हणू तरी काय?
कां होत नाहीस
तू माझी माय
तू केलंस
माझं
दुखलं-खुपलं,
हागलं-मुतलं
होय-नोय.
मी चोखली तुझी स्तनं.
तू फिरवली बोटं माझ्या केसातून.
तू मला आईसारखी.
मी तुला मुलासारखा.
-पण सारखाच ना!
स्तनं होती कोरडी
आणि
केस राठ.
तुला माझ्या
मूलपणाचा बाट;
मला हिणावते
मांडीमधून
वासना ताठ.
संभोगाचा अर्थ
सम भोग
नाही केला
म्हणून का ही शिक्षा-
होत नाहीस तू माझी माय?
पोट
अन्
ओटी पोट
भरल्यावर
कां होत जातो
दुय्यम-
पुरुषोत्तम!
तुझी योनी,
तुझे स्तनः
अख्खे तुझे
आईपण.
माझ्या जननीचा
पाडलास विसर मला;
पण झाली नाहीस
माझी माय.
उमा,
पारू,
गौरी,
तुला म्हणू तरी काय?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा