सवाष्णीच्या हातातला
दीप ल्याले वृंदावन;
हिर्व्या,बिलोरी वर्खाने
त्याचे लपेटले मन.
निखार्याच्या मिठीतली
झाली सुगंधित राळ;
समईच्या गळा आली
दीपकलिकांची माळ.
गुलाबाच्या खांद्यावर
जड निर्माल्याची मूस;
तुळशीच्या गात्री निघे
गंधभारला जुलूस.
दीप ल्याले वृंदावन;
हिर्व्या,बिलोरी वर्खाने
त्याचे लपेटले मन.
निखार्याच्या मिठीतली
झाली सुगंधित राळ;
समईच्या गळा आली
दीपकलिकांची माळ.
गुलाबाच्या खांद्यावर
जड निर्माल्याची मूस;
तुळशीच्या गात्री निघे
गंधभारला जुलूस.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा